संत गाडगेबाबा ललित कला महाविद्यालय, हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत चालणारे मराठवाड्यातील पहिले व एकमेव ललित कला महाविद्यालय आहे. जिथे नृत्य मध्ये भरतनाट्यम कथ्थक हे विषय शिकवले जातात तसेच नाट्यशास्त्र आणि भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत याबद्दल शिकवले जाते.
ललित कला म्हणजे सौंदर्य आणि कलात्मक अभिव्यक्तीसाठी निर्माण केलेल्या कला प्रकारांचा समूह. यात चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाटक, साहित्य (कविता, कथा, कादंबर्या) यांसारख्या विविध कला प्रकारांचा समावेश होतो. ललित कला सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करतात, तसेच वैयक्तिक अभिव्यक्तीचे एक शक्तिशाली माध्यम म्हणून कार्य करतात.